Navy Recruitment 2024:- तुम्ही देखील संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करण्याच्या उद्देशाने तयारी करत असाल आणि त्यातल्या त्यात भारतीय नौदलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी असून तुमचे भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न यामुळे आता पूर्ण होऊ शकणार आहे.
कारण भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन कोर्स 2025 अंतर्गत 250 पदांच्या विविध जागा भरल्या जाणार असल्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन देखील आता करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने अविवाहित पुरुष/ महिलांना अर्ज करता येणार आहे.
या कॅडरमध्ये होत आहे भरती?
भारतीय नौदलाच्या माध्यमातून शॉर्ट सर्विस कमिशन कोर्स 2025 अंतर्गत 250 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून त्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
ही भरती प्रामुख्याने जनरल सर्विस( जीएसएक्स) हायड्रो केडर, पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर, ट्रॅफिक कंट्रोल लॉजिस्टिक्स, नावल अर्मामेंट इन्स्पेक्टोरेट, शिक्षण तसेच इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रिक ब्रांच या कॅडरसाठी भरती राबविण्यात येत असून याकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
केडरनिहाय रिक्त जागांची संख्या किती आहे?
1- जनरल सर्विस( जीएसएक्स) हायड्रो केडर– च्या 56 जागा रिक्त आहेत.
2- पायलट– एकूण रिक्त जागांची संख्या 24 आहे.
3- नावल एयर ऑपरेशन्स ऑफिसर– एकूण रिक्त जागांची संख्या 21
4- लॉजिस्टिक्स– एकूण रिक्त जागांची संख्या 20
5- एअर ट्राफिक कंट्रोल– एकूण रिक्त जागांची संख्या 20
6- नावल अर्मामेंट इन्स्पेक्टोरेट– एकूण रिक्त जागांची संख्या 16
7- शिक्षण– एकूण रिक्त जागांची संख्या 15
8- इंजिनिअरिंग ब्रांच– एकूण रिक्त जागांची संख्या 36
9- इलेक्ट्रिकल ब्रँच– एकूण रिक्त जागांची संख्या 42 इतकी आहे.
या कॅडरसाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
केडरनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता
1- जनरल सर्विस( जीएसएक्स)/ हायड्रो कॅडर– उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बीई/ बी टेक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2- पायलट, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, एअर ट्रॅफिक कंट्रोल– याकरिता उमेदवार 60 टक्के गुणांसह बीई/बीटेक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3- लॉजिस्टिक्स– याकरिता उमेदवार 60% गुणांसह बीई/ बीटेक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून याशिवाय एमएपीए प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण आवश्यक आहे. बीएससी, बीएससी आयटी आणि बीकॉम यामध्ये प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर पीजी डिप्लोमा फायनान्स, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण होणे आवश्यक आहे.
4- नावल अर्मामेंट इन्स्पेक्टोरेट, शिक्षण, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल ब्रांच– यामधील पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या वेबसाईटला भेट देऊन अधिकची माहिती घेणे गरजेचे आहे.
निवड झाल्यानंतर पुढे काय?
या भरती अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशनमध्ये जे उमेदवार निवडले जातील त्यांना भारतीय नौदलामध्ये दहा वर्ष कालावधी करिता नोकरीची संधी मिळेल व प्रत्येकी दोन वर्ष असे दोन वेळा यामध्ये मुदतवाढ दिली जाणार आहे.
अशी मुदतवाढ देताना उमेदवाराची सेवा तसेच त्याचा अनुभव व परफॉर्मन्स, वैद्यकीय पात्रता आणि संबंधित उमेदवाराची इच्छा इत्यादी गोष्टींचा विचार केला जाणार असून ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना पहिली दोन वर्ष प्रोबेशनचा कालावधी पूर्ण करणे गरजेचे राहील. जे उमेदवार लेफ्टनंट पदी निवडले जातील अशा उमेदवारांचे मूळ वेतन 56 हजार 100 रुपयांपासून सुरू होते व इतर भत्ते देखील मिळतात.
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन मध्ये होणाऱ्या या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील ते 29 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.