बैंक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती ! आताच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर…

Bank of Maharashtra recruitment 2022

Bank of Maharashtra recruitment 2022 :- महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे,  Bank of Maharashtra मध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे,

इच्छूक उमेदवारांना bankofmaharashtra.in वर अर्ज करायचा आहे. आज 5 फेब्रुवारी पासून त्यासाठी अ‍ॅप्लिकेशन लिंक खुली करण्यात आली आहे.

ही नोकरभरती जनरलिस्ट ऑफिसर स्केल 2 आणि 3 साठी आहे. तर 22 फेब्रुवारी 2022 ही अंतिम मुदत असणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना एक ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा 12 मार्च 2022 दिवशी होणार आहे. या परीक्षेमधूनही उत्तीर्ण झालेले उमेदवार जीडी/ मुलाखत फेरी साठी बोलावले जाणार आहेत.

यंदाच्या वर्षासाठी एकूण 500 जागांवर नोकरीची संधी आहे. हे देखील नक्की वाचा: SBI PO Mains Result 2021 जाहीर; sbi.co.in वर असा पहा तुमचा स्कोअर.

एकूण जागा आणि पगार
Generalist Officer Scale-II या पदाच्या 400 जागा आहेत. त्यामध्ये अनारक्षित 162, एससी 60, एसटी 30, ओबीसी 108, ईडब्लूएस 40 जागा आहेत. तर पगार Rs. 48170 – (1740/1) – 49910 – (1990/10) – 69810.आहे.

Generalist Officer Scale-III या पदासाठी 100 जागा आहेत. त्यामध्ये अनारक्षित 41,एससी 15, एसटी 7, ओबीसी 27 आनि ईडब्लूएस 10 जागा आहेत. तर पगार Rs. 63840 – (1990/5) – 73790 – (2220/2) – 78230.आहे.

शैक्षणिक पात्रता 
Generalist Officer Scale-II आणि III साठी उमेदवार किमान पदवीधर तसेच 60% गुण असलेला असावा. सोबतच Scale-II साठी 3 वर्षाचा अनुभव आणि वयोमर्यादा 25 ते 35 वर्ष आवश्यक आहे. तर Scale-III साठी 5 वर्षांचा अनुभव आणि वयोमर्यादा 25 ते 38 वर्ष अपेक्षित आहे. UR / EWS / OBC या वर्गातील उमेदवारांना अर्जासोबत Rs. 1180 चे शुल्क तर SC / ST साठी Rs. 118 रुपये शुल्क आहे. इथे पहा नोटिफिकेशन.

असा करा अर्ज

अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in ला भेट द्या.

‘Careers’सेक्शन मध्ये “GENERALIST OFFICERS IN SCALE II & III PROJECT 2022-23” खाली असलेल्या ‘Apply Online (Registration Starts between 05-02-2022 to 22-02-2022)’वर क्लिक करा.

तिथे तुमचं नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इमेल आयडी टाका.

‘Validate your details’वर क्लिक करून तुमचे डिटेल्स व्हॅलिडेट करा.

फोटो, स्वाक्षरी आणि लेफ्ट थम्ब इम्प्रेशन आणि हॅन्ड रिटन डिक्लरेशन अपलोड करा.

अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा. प्रिव्ह्यू टॅब वर क्लिक करून एकदा तो नीट तपासून घ्या आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा.

आता तुमच्या फॉर्मची तुम्ही प्रिंट आऊट देखील काढू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe