MGNREGA Pune Bharti 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती’ पदांच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार असून, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे. तरी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून यासाठी आपले अर्ज सादर करावेत. लक्षात घ्या ही भरती पुण्यात होणार असून, उमेदवार आपले अर्ज ‘उपजिल्हाधिकारी (रोहयो) पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग, तळमजला पुणे 411001’ येथे पोस्टाने पाठवू शकतात. येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवार पोस्टाने आपले अर्ज पाठवू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तरी भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही mahaegs.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.