Best Remote Job:- सध्या तुमची शैक्षणिक पात्रतेला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे तुमच्यामध्ये असलेल्या कौशल्य आणि इतर गुणांना देखील आहे. तुमच्यामध्ये जर काही खास कौशल्य असतील तर अशा प्रतिभावान लोकांची निवड भारतातच नाही तर जगभरातील कंपन्यांच्या माध्यमातून देखील केले जाते.
असे कौशल्य असणारे लोक अगदी त्यांच्या घरी बसून देखील महिन्याला लाखो रुपयापर्यंत पैसे कमवू शकतात. फक्त आपल्याला याकरिता काही शैक्षणिक पात्रता धारण करणे गरजेचे असते. आपल्याला माहिती आहे की सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने असे अनेक जॉब्स आहेत की ते तुमच्या कौशल्यावर आधारित पैसा मिळवून देतात.
त्यामुळे आता अशा उमेदवारांना अगदी बऱ्याच कंपन्यांकडून घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते व एवढेच नाही तर चांगले पॅकेज देखील मिळते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये असे रिमोट जॉब म्हणजेच नोकऱ्यांची यादी बघणार आहोत जे तुम्हाला उत्कृष्टपणे उत्पन्न देऊ शकतात.
या आहेत चांगले उत्पन्न देणाऱ्या नोकऱ्या
1- सॉफ्टवेअर डेव्हलपर– सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हे नवनवीन सॉफ्टवेअर तयार करण्यामध्ये खूप तज्ञ असतात व ते एप्लीकेशन डिझाईन करतात. एवढेच नाहीतर कोडींग करण्यामध्ये देखील ते एक्सपर्ट असतात आणि माध्यमातून सॉफ्टवेअर कशाप्रकारे काम करत आहे किंवा ते चांगल्या प्रकारे काम करत आहे की नाही हे सुनिश्चित करत असतात.
ज्या व्यक्तींना तंत्रज्ञानाची आवड आहे अशा व्यक्तींकरिता सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी ही फायद्याची ठरते. तसेच या जॉब साठी कोडींगची माहिती असणे आवश्यक असते.
2- डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट– या क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने ज्या काही जाहिरात किंवा प्रचार केले जाते त्याचे संपूर्ण प्लॅनिंग हे डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट बनवत असतात. हे व्यक्ती ईमेल कॅम्पेन तसेच सोशल मीडिया आणि वेबसाईट ऑप्टीमायजेशन सारख्या गोष्टींवर काम करतात..
सध्या ऑनलाईन ट्रेंड्स कोणत्या पद्धतीने जात आहे किंवा कशा पद्धतीचा आहे याची उत्तम जाण या क्षेत्रातील व्यक्तींना असणे गरजेचे असते. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट देखील खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतात.
3- ग्राफिक डिझायनर– आकर्षक दृश्य सामग्री तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनरचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यामध्ये ग्राफिक डिझायनर्स विविध प्रकारचे लोगो तसेच ब्राउशर्स, पोस्टर्स आणि डिजिटल ग्राफिक्स तयार करतात व ते कलर,
विविध फॉन्ट आणि इमेजेस चा वापर करून विशेष प्रकारे डिझाईन तयार करत असतात. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी आणि तंत्रज्ञान याचा एक उत्तम संगम असणे गरजेचे असते.
4- प्रोजेक्ट मॅनेजर– प्रोजेक्ट मॅनेजर यांचे काम जर पाहिले तर ते विविध प्रकल्पांचे व्यवस्थित नियोजन तसेच कामावरचे नियंत्रण आणि ते काम किंवा तो प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
प्रोजेक्ट मॅनेजरच्या हाताखाली एक पूर्ण टीम काम करत असते व प्रकल्प वेळेमध्ये आणि दिलेल्या बजेटमध्ये पूर्ण करण्यासाठी ते विशेष प्रकारची मदत करत असतात. प्रोजेक्ट मॅनेजर्समध्ये उत्तम संवाद कौशल्य आणि नियोजन कौशल्य हे गुण असणे आवश्यक असते.
5- वर्चुअल असिस्टंट– व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे एक ऑनलाईन सहाय्यक असतो जो ई-मेलचे मॅनेजमेंट तसेच कागदपत्रांची तयारी आणि एखाद्या कामाचे वेळापत्रक व्यवस्थापन यासारखी जबाबदारी सांभाळतात.
विशेष म्हणजे ही नोकरी कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर करून घरबसल्या देखील केली जाते. त्यामुळे या नोकरीला खूप फायदेशीर आणि सोयीस्कर मानले जाते.
6- डाटा ॲनालिस्ट– डाटानालिस्ट हे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा डेटा गोळा करण्याचे काम करतात व जमा केलेल्या डेटाचे विश्लेषण देखील करतात व महत्त्वाची माहिती काढून ती संबंधित कंपनीला पुरवत असतात. हे काम करण्यासाठी व्यक्तीमध्ये विशेष आकडेवारी आणि गणितीय कौशल्य असण्याची गरज असते व त्यामुळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मदत होते.
7- ऑनलाइन टीचर– ऑनलाइन टीचर म्हणजेच जो इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवतो व यावर व्याख्याने देतो. तसेच विद्यार्थ्यांना असलेल्या शंकांचे समाधान करतो. या प्रकारची नोकरी देखील तुम्ही घरी बसून करू शकतात व विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतात.
8- वेब डिझायनर– वेब डिझायनरचे काम असते की तो वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट डिझाईन करतो व डिझाईनचे रूप रंग तसेच वेबसाईटची संपूर्ण रचना तयार करण्याचे महत्त्वाचे काम करतो. हा जॉब देखील चांगल्या पद्धतीने पैसा मिळवून देऊ शकतो.
9- कन्टेन्ट रायटर– कंटेन रायटर विविध वेबसाईट तसेच ब्लॉग, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर माध्यमांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक तसेच माहितीपूर्ण मजकूर किंवा माहिती लिहिण्याचे काम करतात व ही नोकरी ज्यांच्यामध्ये चांगले लेखन कौशल्य आणि विविध विषयांची उत्तम जाण आहे अशा व्यक्तींसाठी घरबसल्या चांगला पैसा मिळवून देते.
या सगळ्या नोकऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता किंवा योग्यता कोणती?
वर उल्लेख केलेल्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये त्यासाठी लागणारे आवश्यक योग्यता आणि शिक्षण हे नोकरीचा प्रकार कोणता आहे त्यावर प्रामुख्याने अवलंबून असतं. समजा तुम्हाला तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी करायचे असेल तर त्यासाठी आयटी किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये पदवी असणे गरजेचे असते.
ग्राफिक डिझायनरसाठी कला किंवा डिझाईनमध्ये शिक्षण घेणे गरजेचे असते. यामध्ये प्रत्येक नोकरीमध्ये जे काही कौशल्य हवे आहेत त्या पद्धतीचे योग्य शिक्षण आणि कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही यशस्वीरित्या तुमच्या करिअरला चांगले वाढवू शकता व चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवू शकतात.