BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मिळेल 49 ते 69 हजार रुपये पगार

Ajay Patil
Published:
bob recruitment 2024

BOB Recruitment 2024:- अनेक तरुण-तरुणी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि शासनाच्या विविध विभागांतर्गत व बँकांच्या माध्यमातून ज्या काही रिक्त पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांची तयारी करत असतात. सध्या केंद्र व राज्य शासनाच्या अनेक विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून गेल्या कोरोना कालावधीपासून स्थगित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियांना आता वेग देण्यात आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर बरेच तरुण हे बँकेच्या विविध पदांसाठीच्या परीक्षांकरिता देखील तयारी करत असतात. अशा तरुण-तरुणींकरिता बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून एक सुवर्णसंधी चालून आली असून या बँकेच्या माध्यमातून आता विविध पदांची भरती केली जाणार आहे  व एवढेच नाही तर याकरिता महत्वाची नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लेखांमध्ये याच भरती विषयीची माहिती आपण घेऊ.

 बँक ऑफ बडोदामध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याकरिताची नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिक्युरिटी मॅनेजर या पदासाठी  भरती होणार आहे

व ही भरती साधारणपणे 38 रिक्त जागा भरण्यासाठी घेतली जाणार आहे. ज्या इच्छुकांनी पात्र उमेदवारांना याकरिता अर्ज करायचा असेल ते ऑनलाईन पद्धतीने यामध्ये अर्ज करू शकणार आहेत. सिक्युरिटी मॅनेजर म्हणजे सुरक्षा अधिकारी या पदाच्या 38 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

 प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील

यामध्ये जर आपण रिक्त जागांचा विचार केला तर एससी कॅटेगिरीच्या पाच, एसटी कॅटेगिरीच्या दोन, ओबीसी प्रवर्गाच्या 10, इडब्ल्यूएस प्रवर्गाच्या तीन आणि खुला प्रवर्गाच्या 18 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदामध्ये या रिक्त पदांकरिता  ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केली असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला आर्मी/ नेव्ही/ एअर फोर्स मधील कमिशन्ड सेवेचा कमीतकमी पाच वर्षाचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे.

 किती आहे वयोमर्यादेची अट?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 25 ते कमाल 35 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. जे उमेदवार एससी/ एसटी कॅटेगिरीतील असतील त्यांना पाच वर्षाची तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयात तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

 किती आहे अर्ज शुल्क?

या भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार असून ते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाशे तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना शंभर रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.

 या भरतीत उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

यामध्ये ऑनलाईन चाचणी तसेच सायकोमेट्रिक चाचणी किंवा गटचर्चा आणि मुलाखत अशा पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड अंतिम होऊन ज्यांना नोकरीवर रुजू केले जाईल अशा उमेदवारांना प्रतिमाह 49 हजार 910 रुपये ते 69 हजार 810 इतका पगार दिला जाईल.

 या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कागदपत्रे

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून या अर्जासाठीची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2024 आहे.तसेच या भरतीकरिता उमेदवारांना रिझ्युम, दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला तसेच जातीचा दाखला( मागासवर्गीय उमेदवारांकरिता), ओळखपत्र(आधार कार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe