BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले पाठवावेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, श्रवणतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होईल, तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
अर्ज, ‘नपा- सोटीस्तै, पोएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीचाली (पू), मुंबई – 4008166’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, तसेच भरती संबंधित आणखी माहिती मिळण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट देऊ शकतो.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे, अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होत असून, 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच आपले अर्ज सादर करायचे आहेत.
-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरलेली असावी, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. याची उमेदवाराने दक्षता घ्यावी, तसेच अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.













