Coalfield Limited Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्या तरुणांचे दहावी आणि बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड येथे काही रिक्त पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
या पदभरतीच्या माध्यमातून 608 रिक्त पदाच्या जागा भरल्या जाणार असून यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती
ट्रेड आणि फ्रेशर अप्रेंटीसच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती?
ट्रेड अपरेंटीस पदाच्या 536 रिक्त जागा आणि फ्रेशर अप्रेंटीस या पदांच्या 72 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच आयटीआय प्रमाणपत्र धारक उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत.
आवश्यक वयोमर्यादा
18 ते 32 वर्ष वयोगटातील उमेदवार वर नमूद केलेल्या पदासाठी पात्र राहणार आहेत. याबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवाराने एकदा अधिसूचना वाचणे गरजेचे आहे.
हे पण वाचा :- आज अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह ‘त्या’ 13 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाची माहिती
अर्ज कसा करावा लागणार?
या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. centralcoalfields.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?
24 मे 2023 पासून या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 18 जून 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
जाहिरात कुठे पाहता येणार?
https://www.centralcoalfields.in/pdfs/updts/2023-2024/24_05_2023_apprentice_25.pdf या लिंक वर जाऊन उमेदवाराला या पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे.
हे पण वाचा :- पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आजपासून सुरु होणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, संपूर्ण रूट, थांबे, टायमिंगबाबत वाचा…