‘एनर्जी मॅनेजमेंट’ मध्ये पूर्ण करा अभ्यासक्रम! मिळेल लाखो रुपये पगाराची नोकरी; जाणून घ्या करिअरच्या संधी

ऊर्जा म्हटले म्हणजे अगदी घरगुती वापरापासून ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत प्रत्येकाच्या विकासासाठी एक महत्त्वाचा आधार समजला जातो. परंतु नैसर्गिक साधन संपत्ती पासून होणारे ऊर्जेचे सतत शोषण आणि पृथ्वीची तापमान वाढ आणि असंतुलित असे वातावरण जर बघितले तर ऊर्जा उत्पादन क्षेत्रामध्ये योग्य व्यवस्थापनाची गरज आहे.

Ajay Patil
Published:
energy management

Course In Energy Management:- ऊर्जा म्हटले म्हणजे अगदी घरगुती वापरापासून ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत प्रत्येकाच्या विकासासाठी एक महत्त्वाचा आधार समजला जातो. परंतु नैसर्गिक साधन संपत्ती पासून होणारे ऊर्जेचे सतत शोषण आणि पृथ्वीची तापमान वाढ आणि असंतुलित असे वातावरण जर बघितले तर ऊर्जा उत्पादन क्षेत्रामध्ये योग्य व्यवस्थापनाची गरज आहे.

ऊर्जा व्यवस्थापन तसेच एनर्जी मॅनेजमेंट व्यवसायिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही यामध्ये उत्तम करिअर करू शकतात.

ऊर्जा मॅनेजमेंट क्षेत्रातील महत्त्वाचे अभ्यासक्रम जे भविष्यासाठी ठरतील फायद्याचे
यामध्ये विज्ञान शाखेतून पदवी, पदव्युत्तर किंवा अभियांत्रिकी करणाऱ्यांसाठी एनर्जी मॅनेजमेंट म्हणजेच ऊर्जा व्यवस्थापन हा करिअरचा उत्तम पर्याय आहे. बीटेक, बीई किंवा बीएससी नंतर तुम्ही एमबीए किंवा पीजीडीएम किंवा एम.टेक इन एनर्जी मॅनेजमेंट अशा पद्धतीचे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.

देशातील अनेक आघाडीच्या संस्था आणि विद्यापीठे पदव्युत्तर स्तरावर ऊर्जा व्यवस्थापन किंवा ऊर्जा अभ्यासाशी संबंधित अभ्यासक्रम चालवत आहेत.

अनेक व्यावसायिक संस्था एनर्जी मॅनेजमेंट किंवा पावर मॅनेजमेंटमध्ये एमबीए अभ्यासक्रम देखील देतात. एनर्जी मॅनेजमेंट मध्ये तेल, वायु, जैवइंधन तसेच पाणी, पवन आणि सौर ऊर्जा सारख्या नैसर्गिक स्त्रोतांपासून ऊर्जेचे उत्पादन तसेच ऊर्जेची साठवण आणि बचत यांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो.

ऊर्जा मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इथे मिळतील करिअरच्या संधी
हे एक व्यापक कार्यक्षेत्र आहे व यामध्ये कुशल ऊर्जा व्यवस्थापकांसाठी सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकरीच्या उत्तम अशा संधी उपलब्ध आहेत. आता मोठ्या कंपन्यांमध्ये एनर्जी ऑडिटिंग, एनर्जी सेविंग आणि एनर्जी मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन असलेल्या उमेदवारांची खास नियुक्ती केली जाते.

तुम्ही या क्षेत्रात प्रोजेक्ट किंवा ऑपरेशन्स मॅनेजर, एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी एक्सपर्ट, मॅनेजर तसेच पावर ट्रेनिंगमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून नोकरी करू शकतात.

एनटीपीसी, नॅशनल पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, दामोदर व्हॅली कार्पोरेशन, एनएचपीसी, नेवेली लिग्नाइट कार्पोरेशन इत्यादी प्रमुख संस्था आहेत. ज्यामध्ये ऊर्जा व्यवस्थापनात एमबीए करणाऱ्यांना सध्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात.

या क्षेत्रातील प्रमुख अभ्यासक्रम आणि संस्था

1- एम.टेक( ऊर्जा तंत्रज्ञान आणि पर्यावरण व्यवस्थापन)- ऊर्जा आणि पर्यावरण व्यवस्थापन शाळा, राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठ,भोपाळ

2- एमबीए( एनर्जी मॅनेजमेंट)- राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम तंत्रज्ञान, रायबरेली

3- एम.टेक( ऊर्जा व्यवस्थापन)- स्कूल ऑफ एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, देवी अहिल्या विद्यापीठ,इंदूर

4- एम.टेक( ऊर्जा व्यवस्थापन)- यांत्रिक अभियांत्रिकी विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कालिकत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe