DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभागात होत असून, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
वरील भरती “शिपाई ” (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर होत असून, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्या 20/09/2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत “शिपाई ” (गट-ड) पदांच्या एकूण 125 जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार गरजेची आहे. अर्जदारांनी लक्षात घ्या अर्ज करणारा उमेदवार हा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागात होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे इतके आहे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा 05 वर्ष शिथिलक्षम राहील.)
अर्ज शुल्क
अराखीव प्रवर्गासाठी 1000/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900/- रुपये इतके शुल्क आहे.
अर्ज पद्धती
येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, उमेदवार वर दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतो.
वेतन
वरील पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 15 ते 47 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख
अर्ज प्रक्रिया 20 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार dtp.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतो.
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, लक्षात घ्या अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज 20 सप्टेंबर 2023 पासून सुरू होतील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवली जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.