ECHS Ahmednagar Bharti 2023 : ECHS अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !

Sonali Shelar
Updated:
ECHS Ahmednagar Bharti 2023

ECHS Ahmednagar Bharti 2023 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अहमदनगर येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत, ही भरती 21 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार असून, इच्छुक उमेदवार या ताखेपर्यंत येथे अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

ही भरती वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, दंत स्वच्छता/सहायक, लिपिक महिला परिचर, सफाईवाला पदांसाठी होत असून, या भरती अंतर्गत एकूण 29 जागा भरल्या जाणार आहेत. वरील पदांकरिता शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

ही भरती अहमदनगर येथे होत असून येथे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. उमेदवार, ‘ OIC, Stn HQS (ECHS Cell) अहमदनगर’ येथे पोस्टाने अर्ज पाठवू शकतो. अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. देय तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वरील पदांकरिता निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, तर मुलाखतीची तारीख 5 सप्टेंबर 2023 आहे. मुलाखतीचा पत्ता, ‘स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड, असून मुलाखतीसाठी अर्जाच्या आधारावर बोलवले जाईल. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट echs.gov.in ला भेट देऊ शकता.

आवश्यक कागदपत्रे

-मूळ प्रमाणपत्रे/ गुणपत्रिका/ 10 वी मॅट्रिकची पदवी प्रमाणपत्रे
-10+2 आणि पदवी/ पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा/ अभ्यासक्रम प्रमाणपत्रे
-कामाचा अनुभव प्रमाणपत्रे
-डिस्चार्ज बुक, पीपीओ
-सेवा रेकॉर्ड आणि 02 पीपी आकाराचे रंगीत छायाचित्रे’

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
-वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने 21 ऑगस्ट 2023 पर्यंत पाठवायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe