ESIC Pune Bharti 2023 : ESIC पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; मुलाखतीद्वारे होणार निवड !

ESIC Pune Bharti 2023 : पुणे येथे नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे जागा निघाल्या आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी येथे आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, GDMO, विशेषज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा 

वरील भरती अंतर्गत अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, GDMO, विशेषज्ञ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल तरी, मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत असून, जे उमेदवार येथे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

निवड प्रक्रिया

वरील पदांकरिता मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37 येथे दिलेल्या तारखेला कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीसाठी 23 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.esic.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर वेळेत हजर राहावे.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-लक्षात घ्या मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.