सेंट्रल वेअरहाऊसिंग कार्पोरेशनमध्ये पदवीधरांना 29 हजार ते 1 लाखापर्यंत पगार मिळवण्याची सुवर्णसंधी! पटकन करा अर्ज

अनेक तरुण-तरुणी आपल्याला विविध परीक्षांची तयारी करताना दिसून येतात. यामध्ये पदवी संपादन केल्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तसेच बँकिंग क्षेत्रातील परीक्षा व इतर अनेक विभागांतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात असते.

Ajay Patil
Published:
job

Job In CWC:- अनेक तरुण-तरुणी आपल्याला विविध परीक्षांची तयारी करताना दिसून येतात. यामध्ये पदवी संपादन केल्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तसेच बँकिंग क्षेत्रातील परीक्षा व इतर अनेक विभागांतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात असते.

गेल्या काही दिवसांपासून बघितले तर अनेक शासकीय विभागांच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत व त्याचा नक्कीच फायदा विविध परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना होताना दिसून येत आहे.

अगदी या प्रमाणे तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल व परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्या करिता सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन अर्थात सीडब्ल्यूसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे व या मध्ये 179 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे व पदवीधरांना यामध्ये मोठी संधी आहे.

सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशनमध्ये 179 पदांसाठी भरती

पदाचे नाव आणि पात्रता

1- सुपरीटेनडेंट( जनरल)- या पदाच्या 22 जागा रिक्त असून यासाठीची पात्रता पदव्युत्तर पदवी( कोणत्याही शाखेतील) असणे आवश्यक आहे.

2- जूनियर टेक्निकल असिस्टंट- या पदाच्या एकूण 81 जागा रिक्त आहेत व यामध्ये अनुसूचित जाती 17 जागा, अनुसूचित जमाती पाच जागा, इतर मागासवर्गीय 18 जागा, ईडब्ल्यूएस आठ जागा,

खुला प्रवर्गाकरिता म्हणजेच ओपन कॅटेगरी 33 जागा आणि माजी सैनिकांसाठी तेरा पदे राखीव आहेत. दिव्यांग कॅटेगिरीकरिता चार व OH, HH साठी प्रत्येकी दोन पदे राखीव आहेत. या पदासाठी पात्रता ही एग्रीकल्चर विषयातील पदवी किंवा बीएससी( झूलॉजी, केमिस्ट्री किंवा बायो केमिस्ट्री यापैकी एका विषयासह) प्राप्त केलेली असावी.

3- मॅनेजमेंट ट्रेनी( जनरल)- या पदाच्या 40 जागा रिक्त आहेत व यासाठीची पात्रता पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि फर्स्ट क्लास मधील एमबीए( पर्सनल मॅनेजमेंट / ह्यूमन रिसोर्स / मार्केटिंग मॅनेजमेंट / सप्लाय चेन मॅनेजमेंट स्पेशलायझेशनसह) पूर्ण केलेले असावे.

4- मॅनेजमेंट ट्रेनी( टेक्निकल)- या पदाच्या तेरा जागा रिक्त आहेत व पात्रता जर बघितले तर फर्स्ट क्लाससह एग्रीकल्चर मधील पदव्युत्तर पदवी किंवा एन्टोमॉलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ बायो केमिस्ट्री विषयातील फर्स्ट क्लाससह बायोकेमिस्ट्री/ झूलॉजी) यामध्ये पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.

तसेच यामध्ये वेअर हाऊसिंग अँड कोल्ड चेन मॅनेजमेंट/ कॉलिटी मॅनेजमेंट मधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे.

5- अकाउंटंट- या पदाच्या नऊ जागा रिक्त आहे तो याकरिता पात्रता बीकॉम किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट किंवा इंडियन ऑडिट अँड अकाउंटंट डिपार्टमेंट मध्ये एसएएस अकाउंटंट म्हणून मेंटेनन्स आणि ऑडिटिंगचा तीन वर्षाचा कामाचा अनुभव असावा. तसेच ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट व सुप्रिटेंडेंट( जनरल) चे 14 पदे नॉर्थ ईस्टर्न रिजन मधील आहेत.

आवश्यक वयोमर्यादा
यामध्ये जर बघितले तर 12 जानेवारी 2025 रोजी ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, आणि मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनी( टेक्निकल)या पदांसाठी 28 वर्षांपर्यंत आणि सुप्रिटेंडेंट( जनरल) व अकाउंटंट या पदांसाठी तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

किती मिळेल वेतनश्रेणी?
यामध्ये ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 29000 ते 93 हजार रुपये, सुपरटेंडंट व अकाउंटंट या पदांसाठी 40 हजारापासून ते एक लाख 40 हजार रुपये, मॅनेजमेंट ट्रेनी जनरल व टेक्निकल पदासाठी 60000 ते एक लाख 80 हजार रुपये इतके वेतन दिले जाणार आहे.

कशी केली जाईल निवड?
या पदांसाठी निवड प्रक्रिया ही ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा दोनशे प्रश्नांची असणार आहे व 200 प्रश्नांसाठी 200 गुण दिले जाणार आहेत.

या परीक्षेचा कालावधी दोन तास 30 मिनिटांचा असणार असून अंतिम निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या मेरीटनुसार केली जाणार आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असून चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या 1/4 गुण वजा केले जाते.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे
ही परीक्षा महाराष्ट्र मध्ये मुंबई,ठाणे,मुंबई, नागपूर,पुणे, छत्रपती संभाजी नगर, नासिक,जळगाव,नांदेड, कोल्हापूर आणि अमरावती व गोवा राज्यातील पणजी इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक
ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते 12 जानेवारी 2025 पर्यंत यासाठी अर्ज करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe