Railway Recruitment 2024:- शासनाच्या विविध विभागांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अनेक विभाग अंतर्गत भरतीच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे.
तसेच संरक्षण आणि रेल्वेमध्ये देखील नोकरीच्या मोठ्या सुवर्णसंधी सध्या चालून आलेले आहेत. त्यामुळे या संधीचे सोने करण्याची नितांत गरज आहे.रेल्वेमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर आता एक उत्तम संधी चालून आलेली आहे.
सध्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभाग अंतर्गत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक तसेच शिपाई पदांच्या एकूण 622 रिक्त जागा असून या जागांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती विषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.
मध्य रेल्वेमध्ये 622 रिक्त जागांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेल्वेच्या माध्यमातून सोलापूर अंतर्गत SSE,JE, sr.Tech, Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर,ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदाच्या अशा एकूण 622 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
त्यामुळे या भरती करिता आंतरविभागीय उमेदवारांकडून आणि भारतीय रेल्वेच्या विविध विभागातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील असे उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीच्या माध्यमातून भरली जाणारी रिक्त पदे
SSE, JE, sr.Tech, Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदासाठी ही भरती प्रामुख्याने घेतली जाणार आहे.
किती आहेत रिक्त पदे?
या भरतीच्या माध्यमातून एकूण 622 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत व हा अर्ज मंडल रेल प्रबंधक कार्यालय, कार्मिक शाखा, सोलापूर, महाराष्ट्र या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांचे नोकरीचे ठिकाणी सोलापूर असेल.
पदाचे नाव व एकूण रिक्त संख्या
SSEया पदाचे एकूण रिक्त जागा सहा, JE पदाच्या एकूण रिक्त जागा 25, sr.Tech या पदाच्या एकूण रिक्त जागा 31, Tech-I या पदाच्या एकूण रिक्त जागा 327, Tech-II या पदाच्या एकूण रिक्त जागा 21, Tech-III या पदाच्या एकूण रिक्त जागा 45, हेल्पर या पदाच्या एकूण रिक्त जागा 125, Ch.OS पदाच्या एकूण रिक्त जागा एक, OS पदाच्या एकूण रिक्त जागा 20, वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण रिक्त जागा सात, कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण रिक्त जागा सात आणि शिपाई पदाच्या एकूण रिक्त जागा सात अशा एकूण 622 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाईट
https://cr.indianrailway.gov.in यावर अधिकची माहिती घेऊ शकतात.