Coast guard Recruitment 2024:- सध्या राज्य सरकारच्या विविध विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील विविध विभागाअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणारे आणि नोकरीच्या संधीची वाट पाहणारे उमेदवारांसाठी हा एक सुवर्णकाळ आहे असे म्हणावे लागेल. भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक भरतीच्या नोटिफिकेशन सध्या जारी करण्यात आलेले आहेत
व त्या अनुषंगाने जर आपण पाहिले तर बारावी पास असलेल्या उमेदवारांना भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. विशेष म्हणजे या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले असून तुम्हाला जर या भरती प्रक्रियेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भारतीय तटरक्षक दलात 260 पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय तटरक्षक दलातील नाविक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून या भरतीतून 260 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी जे इच्छुक उमेदवार असतील ते join.indiancoastguard.cdac.in या भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत.
या भरतीसाठी असलेली आवश्यक वयोमर्यादा
तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल 22 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचा जन्म हा एक सप्टेंबर 2002 ते 31 ऑगस्ट 2006 दरम्यान झालेला असणे गरजेचे आहे.
विभागनिहाय रिक्त पदांची संख्या
ही भरती एकूण 260 पदांसाठी घेतली जाणार असून त्यातील विभागनिहाय रिक्त पदे पाहिली तर….
उत्तर विभाग एकूण रिक्त पदे 79,पश्चिम विभाग एकूण रिक्त पदे 66,उत्तर पूर्व विभाग एकूण रिक्त पदे 68,पूर्व विभाग एकूण रिक्त पदे 33,उत्तर पश्चिम विभाग एकूण रिक्त पदे 12 आणि अंदमान व निकोबार विभाग एकूण रिक्त पदे तीन
अशाप्रकारे एकूण 260 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागेल?
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून याकरिता अर्ज शुल्क म्हणून 300 रुपये भरणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
अशा पद्धतीने करू शकतात ऑनलाइन पद्धतीने अर्ज
1- याकरिता सर्वप्रथम तुम्हाला joinindiancoastguard.cdac.in/cgept या अधिकृत वेबसाईटवर जावे.
2- या ठिकाणी असलेल्या होम पेजवरील ऑनलाईन अर्ज करा लिंक वर क्लिक करावे.
3- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडते व या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
4- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जासाठी असणारी शुल्क भरावे आणि फॉर्म सबमिट करावा.
5- फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा व त्यांची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवावी.
अर्ज प्रक्रिया सुरू आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवारांना 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करता येणार आहे व या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 आहे.