BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल 25 ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार

Ajay Patil
Published:
bmc recruitment 2024

BMC Recruitment 2024:- सध्या दहावी उत्तीर्ण तर पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आलेल्या असून  राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत.

त्याशिवाय रेल्वे व बँकेसारख्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाच्या ठरतील अशा प्रकारच्या भरतीच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आले असल्यामुळे विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूप फायद्याचा आहे.

या अंतर्गत जर आपण बृहन्मुंबई महानगरपालिकाचा विचार केला तर या महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील आता पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून एकूण 38 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती विषयीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी चालून आली असून विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

बीएमसी अंतर्गत राबविण्यात येणारी ही भरती प्रामुख्याने मानव संसाधन समन्वयक अर्थात ह्यूमन रिसोर्सेस कोऑर्डिनेटर या पदांसाठी असून याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 किती आहेत रिक्त पदे?

 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया एकूण 38 रिक्त जागांसाठी राबवण्यात येणार आहे.

 आवश्यक वयोमर्यादा

 बीएमसी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या भरतीसाठी जे उमेदवार पात्र व इच्छुक असतील त्या उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 38 वर्षे असणे गरजेचे आहे.

 अर्ज शुल्क किती भरावे लागेल?

 या भरतीसाठी अर्ज करणारे इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार असून आपल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये तर मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवारांना 900 रुपये इतके अर्ज शुल्क भरावे लागेल.

 आवश्यक शैक्षणिक पात्रता

 उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांचा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणासह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

 किती मिळेल पगार?

 जे उमेदवार या भरतीमध्ये निवडले जातील अशा उमेदवारांना नियुक्तीनंतर 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये इतका पगार असणार आहे.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचा असेल ते 24 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 असणार आहे.

 अर्ज करण्याचे संकेतस्थळ

 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून https://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe