Railway Recruitment 2024:- सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या व विविध परीक्षांच्या तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा कालावधी असून अनेक शासकीय विभाग अंतर्गत भरतीच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात येत असून या कालावधीत संधीचे सोने करण्याची सध्या गरज आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार असो किंवा बँकांच्या माध्यमातून देखील अनेक भरती प्रक्रिया सध्या राबविण्यात येणार आहेत.
![railway recruitment 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/02/a-70.jpg)
अगदी या पद्धतीनेच तुम्ही देखील रेल्वेमध्ये नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत असाल तर अशा विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी देखील रेल्वेच्या माध्यमातून एक मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे व एवढेच नाही तर याकरिता भारतीय रेल्वेने अधिसूचना देखील जारी केली आहे.
भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांच्या 9000 जागांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून टेक्निशियन पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून टेक्निशन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ही भरती तब्बल नऊ हजार जागांसाठी होणार आहे. ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
अशा पद्धतीने करता येईल ऑनलाइन अर्ज
ही भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यामध्ये राबवण्यात येणार असून याकरिता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही भारतीय रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ indianrailways.gov.in ला भेट देणे गरजेचे आहे व या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया टेक्निशन पदांसाठी राबवली जाणार आहे व 9000 हजार पदांसाठी भरती होणार आहे.
या पदांसाठी असलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीकरता जे उमेदवार इच्छुक असतील अशा उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच आयटीआय देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
तसेच उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक तसेच एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण गरजेचे आहे. तसेच इच्छुक उमेदवाराकडे एनसीवीटी/ एससीव्हीटी मान्यता प्राप्त संस्थेतून एसएसएलसी किंवा आयटीआय उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
टेक्निशन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 तर कमाल 33 वर्ष निश्चित करण्यात आले आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
यासाठी उमेदवारांना कॅम्पुटर आधारित( संगणक आधारित) चाचणी द्यावी लागणार असून सीबीटी1 उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला त्यानंतर कम्प्युटर बेस्ट 2 अर्थात सीबीटी 2 परीक्षेमध्ये सहभागी होता येणार आहे.
या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्रांचे वेरिफिकेशन केले जाईल व हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर उमेदवारांना मेडिकल चाचणीसाठी बोलवण्यात येईल. ही सर्व टप्पे यशस्वीपणे पार केल्यानंतर उमेदवाराला मेरिट लिस्टमध्ये स्थान देण्यात येईल. अशा पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची तारीख
यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
साधारणपणे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होणार असल्याची शक्यता आहे. अधिक माहिती करिता रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अपडेट मिळवू शकतात.