Nashik Bharti 2024 : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक अंतर्गत पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी, असा करा अर्ज !

Nashik Bharti 2024

Nashik ZP Karmachari Sahkari Bank Bharti 2024 : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, कम्प्लायन्स ऑफिसर, ई.डी.पी प्रमुख” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल ती पुढीलप्रमाणे :-

मुख्य कार्यकारी अधिकारी :- मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी / बँकींग CAIIB / DBF / DCBM परिक्षा पास असावा / चार्टर्ड अकौंटंट (CA), MBA (Finance) असल्यास प्राधान्य दिले जाईल.

व्यवस्थापक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी/ MS CIT/JAIIB/CAIIB/DBF/DCM किंवा GDC & A.

कम्प्लायन्स ऑफिसर :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी / चार्टर्ड अकौंटंट (CA), MBA (Finance) असल्यास प्राधान्य दिले जाईल.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज nzspksbk@gmail.com या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत, तर ऑफलाईन अर्ज सोमा हाईटस्, नविन आग्रा रोड, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक- ४२२ ०११ या पत्त्यावर पोस्टानी पाठवायची आहेत.

अशा पद्धतीने करा अर्ज

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन वर दिलेल्या ईमेल द्वारे सादर करायचे आहेत, तर ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तसेच अर्ज 09 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, अर्ज हा पूर्ण भरलेला असावा, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe