Career Option: 10 वी,12 वी नंतर 20 ते 25 हजार रुपये पगाराची नोकरी हवी असेल तर करा ‘हा’ कोर्स! रहाल फायद्यात

career option

Career Option:- नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर मात्र पालकांची धावपळ उडायला लागते की आता आपल्या पाल्याचे कुठल्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घ्यावे किंवा कुठला अभ्यासक्रम त्याच्या पुढील आयुष्यासाठी फायद्याचा ठरेल. कारण दहावी आणि बारावीचे वर्ष हे आयुष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉईंट म्हणून ओळखले जाते.

कारण या टप्प्यावर पुढील करिअरच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय हा आयुष्यभरासाठी फायद्याचा ठरतो. यावेळेस जर निर्णय चुकला तर त्याचे परिणाम हे संपूर्ण करिअरच्या दृष्टिकोनातून भोगावे लागतात. सध्या परिस्थितीत दहावी व बारावीच्या परीक्षा दिल्यानंतर मुलांसमोर अनेक करिअरचे नवीन नवीन पर्याय उपलब्ध आहेत.

परंतु या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडावा याबाबत मात्र बरेचजण गोंधळात पडतात. आजकालची नोकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर अशा अभ्यासक्रमांची निवड करणे गरजेचे आहे की जे अभ्यासक्रम पूर्ण करून एक तर स्वतःच्या पायावर स्व:रोजगाराच्या दृष्टीने उभे राहता येईल किंवा कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये प्रति महिना पगाराची नोकरी देखील ताबडतोब मिळेल.

त्यामुळे या लेखात आपण अशाच एका अभ्यासक्रमाविषयी माहिती घेणार आहोत जो दहावी आणि बारावीनंतर पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी मिळवून लाखोमध्ये कमाई करण्याची संधी देऊ शकतो व या अभ्यासक्रमाचे नाव आहे ग्राफिक डिझाईनिंग हे होय. ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स हा विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असा कोर्स असून तुमच्यामध्ये सर्जनशीलता

व कल्पकता असेल तर ग्राफिक डिझाईनिंग कोर्स हा खूप फायद्याचा ठरू शकतो. हा कोर्स डिप्लोमा/ पदवी/ प्रमाणपत्र स्तरावर उपलब्ध असून तुम्हाला दहावी किंवा बारावी पास आऊट झाल्यानंतरच यामध्ये ऍडमिशन घेता येऊ शकते.

 ग्राफिक डिझायनरला नोकरीसाठी असतात अनेक पर्याय

सध्याचे युगे सोशल मीडिया व इंटरनेटचे युग असून अशा परिस्थितीमध्ये देशातील राजकीय दृष्ट्या असलेले लहान-मोठे राजकीय पक्ष असो किंवा छोट्या-मोठ्या कंपन्या, एवढेच नाही तर अनेक सरकारी कंपन्यांना देखील प्रसिद्धीकरिता ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते

व अशा संस्था किंवा कंपन्या किंवा राजकीय पक्ष ग्राफिक डिझायनर ला चांगल्या पगाराच्या नोकरी देतात. एवढेच नाही तर तुम्हाला जर चित्रपट क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही या क्षेत्रात देखील काम करू शकतात.

या क्षेत्रात तुम्हाला अनुभवानुसार अगदी लाखात पगार मिळू शकतो. एवढेच नाहीतर टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींमध्ये देखील तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही या माध्यमातून  अधिक पैसे मिळवू शकतात.

 दहावी आणि बारावी नंतर करता येईल हा अभ्यासक्रम

जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही दहावी आणि बारावी पास केल्यानंतर करू शकतात. तुम्ही जर दहावी किंवा बारावी परीक्षा पास केली असेल तर तुमच्याकरिता ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ अंडर ग्रॅज्युएट पदवी घेणे अधिक चांगले होईल.

एवढेच नाही तर या अभ्यासक्रमात तुम्हाला डिप्लोमा देखील करता येऊ शकतो. जर तुम्ही ग्रॅज्युएशन केले असेल तर डिप्लोमा करणे तुमच्यासाठी अधिक फायद्याचे ठरेल.

 ग्राफिक डिझाईनिंग कोर्स केल्यानंतर मिळतो इतका पगार

या क्षेत्रामध्ये तुम्ही सुरुवातीला 15 ते 25 हजार रुपये प्रति महिना पगार घेऊन सुरुवात करू शकता व वेळ आणि अनुभवानुसार हा पगार लाखो रुपयापर्यंत देखील वाढतो. एवढेच नाही तर ग्राफिक डिझाईनिंग क्षेत्रामध्ये तुम्ही फ्रीलान्सर म्हणून देखील काम करू शकतात

व त्यासोबतच अनुभव मिळत गेल्यानंतर तुम्ही स्वतःची कंपनी उघडून लोकांच्या किंवा कंपन्यांच्या मागणीप्रमाणे प्रसिद्धीसाठी ग्राफिक डिझाईन करू शकतात व जास्तीचा पैसा मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe