DY Patil Vidyapeeth : प्राध्यापक होण्याची उत्तम संधी! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध विद्यापीठात सुरुये भरती…

Content Team
Published:
DY Patil Vidyapeeth

DY Patil Vidyapeeth : पुण्यातील डी वाय पाटील विद्यापीठात विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, शिक्षक/निदर्शक, अपघाती वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज 8 मे पर्यंत पाठवायचे आहेत. यापुढे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

या जागांसाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहे.

ई–मेल पत्ता

यासाठी अर्ज [email protected]/ [email protected] या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://dpu.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.

-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.

-सदर पदांकरिता सविस्तर सूचना dpu.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे आहे. यापुढे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe