Inspirational Story:- स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजेच एमपीएससी आणि यूपीएससी किंवा इतर प्रकारच्या परीक्षांमध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर त्याकरिता प्रचंड प्रमाणात अभ्यासाची गरज असतेच परंतु त्या अभ्यासाला एक निश्चित दिशेची देखील तेवढीच आवश्यकता असते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये असलेले काही गुण जसे की ध्येय ठरवलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आणि कष्ट उपसण्याची जिद्द देखील तेवढीच आवश्यक असते.
याच अनुषंगाने अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आता स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग असे यश संपादन करत आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रचंड प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पारगाव या गावच्या श्वेता उमरे यांचा एकंदरीत प्रवास पाहिला तर तो असाच प्रेरणादायी आहे.
जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात आता अधिकारी पदावर वर्णी
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर जिल्ह्यातील पालगाव येथील श्वेता बाबाभीम उमरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ग्रुप क 2022 मुख्य परीक्षा दिली व यामध्ये उत्तुंग असे यश संपादन केले. अतिशय कष्ट आणि जिद्दीने त्यांनी इंजिनियर ते अधिकारी पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.
जर श्वेता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे वडील हे निवृत्त शिक्षक असून त्यांच्या आई या गृहिणी आहेत. तसेच शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले व त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपुर येथून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतरचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर या ठिकाणी घेतले व इलेक्ट्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या ठिकाणी पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी वर्ग एक ते अभियांत्रिकी परीक्षा अव्वल गुणांनी पास होऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला व आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क 2022 ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून ओपन मधून 24 तर अनुसूचित जातीतून दुसऱ्या क्रमांकांनी त्या उत्तीर्ण झालेले आहेत. मोठ्या कष्टाने त्यांनी हे घवघवीत यश मिळवल्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.