Job News:- सध्याची परिस्थिती बघितली तर नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुण तरुणींना देखील नोकरी मिळणे दुरापास्त झालेले आहे. ज्या भरती प्रक्रिया राबविण्यात येतात त्यामध्ये जे काही रिक्त पदे असतात त्यापेक्षा काही पटीने जास्त उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जातात.
अक्षरशः शिपाई सारख्या पदासाठी देखील पीएचडी व एमबीए झालेले विद्यार्थी अर्ज करताना आपल्याला दिसून येतात. अशी परिस्थिती असताना मात्र दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे.
अशी परिस्थिती असताना देखील मात्र भारतीय पोस्ट विभागाच्या माध्यमातून दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून पोस्ट ऑफिसच्या या भरती प्रक्रियेमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. याकरिता भारतीय पोस्ट विभागाकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत.
भारतीय पोस्ट विभागात दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी
जर तुम्ही दहावी पास असाल व नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून या माध्यमातून भारतीय पोस्ट विभागाने स्टाफ कार ड्रायव्हरच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जारी केली आहे. ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असेल
भारतीय पोस्ट खात्याच्या indiapost.gov.in या संकेतस्थळावर करू शकतात व या पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. भारतीय पोस्टच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत कर्मचारी कारचालकांच्या पदांवर भरती केली जाणारा असून तुम्हीही या पदांसाठी अर्ज करू शकता व याकरिता शेवटची मुदत ही 23 जुलै आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे व वाहन यंत्रणेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. जर उमेदवारांना होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून तीन वर्षाच्या सेवेसह मोटार कार चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असेल तर फायदा मिळू शकतो.
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
ज्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना भारतीय पोस्ट खात्याच्या या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करायचा असेल अशा उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
निवड झाल्यावर किती मिळेल पगार?
भारतीय पोस्ट खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्टाफ कार ड्रायव्हर या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेमध्ये जर निवड झाली तर निवड झालेल्या उमेदवारांना लेवल दोन अंतर्गत 19 हजार 900 रुपये ते 63 हजार 200 रुपये पर्यंत पगार मिळेल.