Pune Bharti 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेअंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी…

Ahmednagarlive24 office
Published:
Pune Zilla Nagari Sahakari Banks

Pune Zilla Nagari Sahakari Banks : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत संपदा सहकारी बँक लि.,पुणे द्वारे सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली आहे.

या भरती अंतर्गत “लिपीक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लिपिक पदासाठी ममान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. तसेच यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा २२ ते २८ वर्षे इतकी आहे.

यासाठी परीक्षा शुल्क देखील भरायचे आहेत, यासाठी एकूण ८२६/- रुपये असे शुल्क आकारले जात आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी येथे क्लिक करावे. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.punebankasso.com/ ला भेट द्यावी.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे थेट सादर करायचे आहेत, तसेच अर्ज शुल्क देखील भरायचे आहेत, लक्षात घ्या जे उमेदवार अर्ज शुल्क भरणार नाहीत, त्यांचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.

-अर्ज वर दिलेल्या संबंधित लिंक द्वारेच सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्ज 28 फेब्रुवारी 2024 पर्यंतच सादर करायचे आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe