Vishweshwar Sahakari Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. द विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जात असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलचा वापर करून आपले अर्ज सादर करावेत.
द विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे अंतर्गत “महाव्यवस्थापक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 असून, अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
महाव्यवस्थापक पदांसाठी उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता असणे देखील गरजेचे आहे. येथे C.A. / Law / MBA असलेल्या उमेदवारांनाच संधी दिली जाईल. यासाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी असून, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
यासाठी अर्ज [email protected] या ईमेलद्वारे सादर करायचे असून, यासाठी उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज ई-मेलद्वारे सादर करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 असून देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास https://www.vishweshwarbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.