फक्त ‘हा’ एक कोर्स करा आणि ताबडतोब बँकेत नोकरी मिळवा! बँकिंग करिअरच्या दृष्टिकोनातून आहे फायद्याचा

आजकाल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध परीक्षांची तयारी केली जाते व याकरिता विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कष्ट करतात. खूप अभ्यास केला जातो आणि विविध परीक्षांना विद्यार्थी समोर जात असतात. तसे पाहायला गेले तर काही क्षेत्रातील प्रवेशाच्या दृष्टिकोनातून काही अभ्यासक्रम हे खूप महत्त्वाचे ठरतात.

Published on -

Career Tips In Banking Sector:- आजकाल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध परीक्षांची तयारी केली जाते व याकरिता विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कष्ट करतात. खूप अभ्यास केला जातो आणि विविध परीक्षांना विद्यार्थी समोर जात असतात. तसे पाहायला गेले तर काही क्षेत्रातील प्रवेशाच्या दृष्टिकोनातून काही अभ्यासक्रम हे खूप महत्त्वाचे ठरतात.

जर तुम्ही अशा पद्धतीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले असाल तर तुम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये पटकन नोकरी मिळणे शक्य होते. विविध परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये बँकिंग क्षेत्राच्या परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे.

साधारणपणे जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर बँकिंग क्षेत्रामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर पदवीनंतर बँक क्लर्क किंवा प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेची तयारी करणे किंवा खाजगी बँकांमध्ये मार्केटिंग विभागात इंटरव्यू देऊन थेट प्रवेश घेणे

इत्यादी मार्ग आपल्याला दिसून येतात. परंतु यापेक्षा एक मार्ग असा आहे की तो तुमचा बँकिंग क्षेत्रामधील प्रवेश अगदी सोपा करू शकतो. त्याच मार्गाची
आपण या लेखात माहिती बघू.

बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी हा कोर्स ठरेल फायद्याचा
तुम्ही देखील बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत असाल व बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची तुमचे इच्छा असेल तर साधारणपणे पदवी मिळवल्यानंतर बँक क्लर्क किंवा प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेची तयारी करणे

किंवा खाजगी बँकांमध्ये मार्केटिंग विभागात इंटरव्यू देऊन प्रवेश आपल्याला घेता येतो. परंतु यापेक्षा जर एक सोपा मार्ग बघितला तर तो खूप फायद्याचा आहे व हा मार्ग अवलंबून तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये सहजपणे प्रवेश करू शकतात.

जर आपण बघितले तर भारतीय बँकांसाठी एक व्यवसायिक संस्था आहे व ही संस्था भारतीय बँकिंग आणि वित्तीय संस्था म्हणजेच IIBF म्हणून ओळखली जाते.

या संस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या कौशल्य विकासावर काम केले जाते. जर तुम्ही बारावी पास असाल आणि बँकिंग क्षेत्रामध्ये जायचे तुमचे स्वप्न असेल तर IIBF या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच DBF परीक्षेची तयारी करू शकतात.

तुम्ही जर ही परीक्षा दिली आणि तुम्ही जर उत्तीर्ण झाला तर त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा रिझ्युम अर्थात बायोडाटा कोणत्याही बँकेत सादर कराल तेव्हा त्यात तुमचा DBF परीक्षेचा स्कोर ठळकपणे नमूद करणे गरजेचे आहे.

त्यामुळे बँक तुम्हाला नोकरी देण्याला प्राधान्य देईल. ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. कारण हीच परीक्षा JAB(जेएबी)नावाने बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घेतली जाते.

म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे ज्युनिअर असोसिएट आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या बँकर्सना पगार वाढ देखील मिळते. DBF आणि JAB या दोन्हींचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्यामुळे तुमच्याकरिता डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स परीक्षा खूप फायद्याची ठरू शकते व तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण करून बँकिंग क्षेत्रात सहजतेने नोकरी मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News