Krishi Vidyapeeth Recruitment: महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! वाचा या भरतीची संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:

Krishi Vidyapeeth Recruitment:- कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण संशोधने आणि विविध पिकांच्या अर्जदाराच्या वाणांच्या निर्मितीमध्ये देशातील प्रमुख कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन संस्था तसेच कृषी विज्ञान केंद्र यांचा मोलाचा वाटा आहे. शेतीच्या संबंधित अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन या विद्यापीठाच्या माध्यमातून पार पाडले जाते.

जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये देखील काही महत्त्वाचे कृषी विद्यापीठे असून त्यातीलच एक महत्त्वाचे कृषी विद्यापीठ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे होय. या विद्यापीठात काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे व याच भरती प्रक्रियेविषयी आपण या रेखात माहिती बघणार आहोत.

 महात्मा फुले कृषी विद्यापीठात रिक्त पदांसाठी भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या अंतर्गत प्रशासनातील रेडिओ जॉकी,लिपिक सह टाइपिस्ट, शिपाई सह सुरक्षा गार्ड, यंग प्रोफेशनल I, यंग प्रोफेशनल-II या पदांच्या एकूण सात असलेल्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदांसाठीचे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जर तुम्हाला देखील या भरती करिता अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ई-मेलच्या माध्यमातून तो तुम्हाला पाठवायचा आहे.

 पदनिहाय रिक्त संख्या

या भरतीमध्ये रेडिओ जॉकी या पदाच्या तीन, लिपिक सह टायपिस्ट पदासाठी एक, शिपाई सह सुरक्षा गार्ड एक, यंग प्रोफेशनल-I या पदासाठी एक आणि यंग प्रोफेशनल-II या पदासाठी एक अशा एकूण सात जागा रिक्त आहेत.

 पदनिहाय लागणारी शैक्षणिक पात्रता

1-रेडिओ जॉकी या पदाकरिता बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि साऊंड एडिटिंगचा अनुभव असणे गरजेचे आहे तसेच कोणत्याही रेडिओ स्टेशनमध्ये आरजे आणि संकलक म्हणून काम केलेले असावे.

2- लिपिक सह टाइपिस्ट या पदाकरिता उमेदवार आहे पदवीधर, एम एस सी आय टी आणि इंग्रजी मराठी टायपिंग चा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

3- शिपाई सह सुरक्षा गार्ड या पदाकरिता उमेदवार बारावी किंवा पदवीधर आणि एक वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

4- यंग प्रोफेशनल-I- या पदासाठी उमेदवार बीटेक. ॲग्री. इंजिनीरिंग असणे आवश्यक आहे.

5- यंग प्रोफेशनल-II- या पदासाठी उमेदवार एम टेक. Agril. Engg.(IDE/SWCE) एम एस सी ॲग्री IWM/ हॉर्टिकल्चर असणे गरजेचे आहे.

 पदनिहाय मिळणारे वेतन

यामध्ये रेडिओ जॉकी या पदासाठी 14000, लिपिक सह टाइपिस्ट या पदाकरिता 12000, शिपायी सह सुरक्षा गार्ड 9000, यंग प्रोफेशनल-I या पदाकरिता 25 हजार तर यंग प्रोफेशनल-II या पदाकरिता 35000 इतके वेतन दिले जाणार आहे.

 नियुक्ती झाल्यावर नोकरीचे ठिकाण

या भरती निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.

 या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2023 आहे.

 अर्ज पाठवण्यासाठी असलेला मेल ऍड्रेस

 यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II यांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी [email protected] या ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे तर इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी [email protected] किंवा [email protected] या ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe