MAFSU Bharti 2024 : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता. भरती संबंधित आणखी माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा…
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत “असोसिएट प्रोफेसर आणि समकक्ष” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
वरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील मास्टर डिग्री असणे आवश्यक असेल, तसेच यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
ऑफलाईन अर्ज महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड,नागपूर- 440 001 (M.S.) या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे, तसेच यासाठी अर्ज शुल्क देखील आकारले जाणार आहेत, राखीव उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर अनारक्षित उमेदवारांसाठी 2000/- रुपये इतके शुल्क आहेत. या भरती संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://www.mafsu.in/ वर मिळून जाईल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
-अर्ज सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला असावा, तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावेत.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज 18 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.