Mahavitaran Bharti 2024: 12वी पास आहात तर महावितरणमध्ये आहे नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 5 हजार पेक्षा जास्त जागांसाठी होणार भरती

Ajay Patil
Published:
mahavitran job

Mahavitaran Bharti 2024:- सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून अनेक भरतींचे  अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्रापासून तर भारतीय रेल्वे विभागात देखील नोकरीच्या सुवर्णसंधी आहेतच परंतु त्यासोबत राज्य शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत देखील विविध प्रकारच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत.

अगदी याच पद्धतीने आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणच्या माध्यमातून देखील पाच हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या माध्यमातून बारावी पास विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे.

 या पदासाठी होणार आहे भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

 प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या

भरती प्रक्रिया एकूण 5,347 विद्युत सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी राबवण्यात येणार असून यामध्ये प्रवर्गनिहाय रिक्त जागांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे व ते पुढील प्रमाणे…

अनुसूचित जाती एकूण रिक्त जागा 673, अनुसूचित जमाती एकूण रिक्त जागा 491, विमुक्त जाती(अ) एकूण रिक्त जागा 150, भटक्या जाती(ब) एकूण रिक्त जागा 145, भटक्या जाती(क) एकूण रिक्त जागा 196, भटक्या जाती(ड) एकूण रिक्त जागा 108, विशेष मागास प्रवर्ग एकूण जागा 108, इतर मागास प्रवर्ग एकूण रिक्त जागा 895, इडब्ल्यूएस एकूण रिक्त जागा 500 व अराखीव एकूण रिक्त जागा 2081

 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

या भरतीकरिता जे पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करतील त्या उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 27 वर्ष असणे गरजेचे आहे.

 आवश्यक शैक्षणिक पात्रता

विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे बारावी पास असणे गरजेचे आहे.

 किती लागेल परीक्षा शुल्क?

जे पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती करिता अर्ज करतील त्यामधील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 250+ जीएसटी व मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांकरिता 125+ जीएसटी इतके परीक्षा शुल्क लागणार आहे.

 अर्ज करण्याची पद्धत शेवटची तारीख

जे उमेदवार पात्र व इच्छुक असतील असे उमेदवार या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत व अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 मार्च 2024 आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

या भरती अंतर्गत जे उमेदवार नियुक्त केले जातील त्या उमेदवारांना प्रथम वर्ष 15 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 16 हजार व दुसऱ्या वर्षी 17 हजार रुपये अशा पद्धतीने पगार मिळणार आहे.

 अधिकच्या माहितीसाठी या ठिकाणी साधा संपर्क

तुम्हाला देखील या भरतीविषयी अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही https://www.mahadiscom.in/ या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe