MSF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती सुरु; 25,000 हजरापर्यंत मिळेल पगार !

MSF Bharti 2023

MSF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [MSF] मध्ये नवीन पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

MSF मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी भरतीची जाहिरात सविस्तर वाचावी आणि आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती ही ‘संगणक तंत्रज्ञ’ पदांसाठी होत असून, सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही संधी उत्तम आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी. यासाठी अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2023 रोजी पासून सुरू झाले आहेत. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार दरमहा 25,000 रूपये इतके वेतन मिळेल, तर यासाठी उमेदवारांची निवड ही मुलखतीद्वारे केली जाणार आहे. अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मुलाखतीसाठी उमेदवार, ‘पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४००००५.’ येथे हजर राहू शकतात. तर मुलाखतीस येताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड. अशी कागदपत्रे सोबत आणावीत.

लक्षात घ्या दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने १ वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाईल.

अर्जाची लिंक

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करा.

भरती जाहिरात

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास येथे क्लिक करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe