Mumbai Customs Recruitment 2024: मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत “गट ‘ क ‘ ( अराजपत्रित / अ – मंत्रालयीन ) संवर्ग” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी सादर करायचा आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
Mumbai Customs Recruitment 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत “गट ‘ क ‘ ( अराजपत्रित / अ – मंत्रालयीन ) संवर्ग” या पदाच्या भरतीसाठी एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी अर्जदार उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 17 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे
नोकरी ठिकाण:
मुंबई
या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत “गट ‘ क ‘ ( अराजपत्रित / अ – मंत्रालयीन ) संवर्ग” या पदासाठी अर्जदार उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपला अर्ज अंतिम तारखेपूर्वी सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त, पी आणि ई (मरीन), अकरावा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
महत्त्वाची सूचना:
- मुंबई कस्टम्स विभाग भरतीसाठी उमेदवार आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत एका लिफाफ्यात चांगल्या प्रकारे बंद करून संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत आपला अर्ज दिलेल्या तारखेच्या आत पोहोचेल या पद्धतीने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mumbaicustomszone1.gov.in/ |