TMC Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. कोणत्या जागांसाठी ही भरती होत आहे, आणि किती तारखेला मुलाखती घेण्यात येणार आहेत, चला जाणून घेऊया.
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत “सल्लागार (सामान्य औषध)” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 15 फेब्रुवारी 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या अर्जासह हजर राहायचे आहे.
![TMC Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/02/ahmednagarlive24-TMC-Bharti-2024.jpg)
या भरती साठी उमेदवाराकडे M.D. / D.N.B. (इंटर्नल मेडिसिन) किंवा राष्ट्रीय औषध आयोगाद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे, तरच तो मुलाखती साठी हजर राहू शकतो. तर यासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
ही भरती मुंबईत होत असून, एच.आर.डी. विभाग, दुसरा मजला, सर्व्हिस बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई – ४०० ०१२ या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. तरी तुम्हाला या भरती संबंधित आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://tmc.gov.in/ ला भेट देऊ शकता.
निवड प्रक्रिया !
-या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
-इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
-मुलाखतीस येताना सोबत अर्ज व आवश्यक कागदपत्रे आणावीत.
– उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहीरत काळजीपूर्वक वाचावी.