Nashik Bharti 2023 : नाशिक येथील उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे, नाशिक आरोग्य विभागात सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
नाशिक आरोग्य विभागात एकूण 1039 पदांवर भरती होणार आहे, या भरतीअंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा जागा भरल्या जाणार आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.00 पासून सुरु झाली आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. तुम्हीही येथे काम करण्यास इच्छुक असाल तर देय तारखे अगोदर तुमचे अर्ज सादर करायचे आहेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव आणि रिक्त जागा
या भरतीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांच्या एकूण 1039 जागांवर भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती नाशिक येथे होत असून, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
वयोमर्यादा
वरील पदांनुसार वयोमर्यादा वेगवगेळी असेल.
अर्ज पद्धती
वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
असा करा अर्ज
-वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.