NDA Pune Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज सादर करू शकता, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, त्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकचा वापर करायचा आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे, त्यासाठी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज सादर करा. ऑनलाईन अर्ज https://ndacivrect.gov.in/index.html#/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला पाहिजे, अपूर्ण अर्ज नाकारण्यात येतील. या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट www.nda.nic.in ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज https://ndacivrect.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
-लक्षात घ्या अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील, इतर कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, आणि अटी समजून घ्याव्यात.