New India Assurance Bharti 2024 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असून, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल, आणि 15 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज प्रक्रिया संपेल.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष. उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करण्याची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे इतकी आहे.
या भरतीसाठी ऑनलाईनया अर्ज https://www.newindia.co.in/portal/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. लक्षात घ्या दुसऱ्या मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही, भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.newindia.co.in/ ला भेट द्या.
अशा प्रकारे करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असून, 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या देय तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी, भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.