BEL Bharti 2024 : बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहे, या भरतीसाठी कसा अर्ज करायचा आणि याची पात्रता काय असेल? जाणून घेऊया…
वरील भरती अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता – I” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 असून, देय तारखे अगदोर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
या भरतीसाठी अर्जदार B.E./B.Tech/B.Sc. मध्ये 55 टक्क्यांसह CSE/IS/IT मध्ये अभियांत्रिकी मध्ये ४ वर्षाचा अनुभवी हवा. तसेच येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे. अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे देखील आवश्यक आहे. अर्ज 177/- रुपये असेल, लक्षात घ्या अर्ज शुल्काशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाही.
या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://bel-india.in/ ला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचा आहे.
-या भरतीसाठी अर्ज हा पूर्ण भरलेला असावा, अर्ज अपूर्ण असल्यास अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडणे देखील गरजेचे आहे. तसेच अर्ज 07 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.