NIN Pune Bharti 2024 : NIN पुणे मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु, 47 हजारापर्यंत मिळेल पगार !

Content Team
Published:
NIN Pune Bharti 2024

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी त्याआधी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत “अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओ थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर (अया वॉर्ड मुलगा), केअरटेकर (वॉर्डन), ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही गरजेची आहे, अर्ज करण्यापूर्वी पात्रता तपासून घ्यावी, यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील. अर्जदार https://ninpune.co.in/#/session/signup या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करू शकतील.

अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरायचे आहेत, General आणि OBC उमेदवारांसाठी 500/- रुपये तर For SC, ST, EWS उमेदवारांकडून कोणतेही शुल्क स्वीकारले जाणार नाही. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.ninpune.ayush.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 असून देय तारखे पूर्वी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
-एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe