ONGC Recruitment 2023:- सध्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून नोकरी मिळवण्यासाठी हा एक सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नुकतेच वन विभागाच्या माध्यमातून परीक्षा पार पाडण्यात आल्या. तसेच तलाठी भरतीची परीक्षा देखील नुकतीच पार पडली.
एवढेच नाही तर राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत देखील भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. याशिवाय सरकारच्या विविध महामंडळ अंतर्गत देखील विविध पदांवर बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर हा आनंदाचा काळ आहे. या अंतर्गत जर आपण पाहिले तर तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनजीसीमध्ये देखील आता विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली असून ओएनजीसीच्या संकेतस्थळावर जाऊन पात्र उमेदवार या भरतीकरिता अर्ज करू शकणार आहेत.
ओएनजीसीमध्ये होत आहे 2500 रिक्त पदांकरिता भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्याकरिता ओएनजीसीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेतून एकूण 2500 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये देशातील विभागनिहाय रिक्त पदे असून त्यानुसार उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहेत.
विभागनिहाय रिक्त पदे
या भरतीचा जर आपण विचार केला तर उत्तर विभागांमध्ये 159, मुंबई विभागामध्ये 436, पश्चिम विभागांमध्ये 732, पूर्व विभागांमध्ये 593, दक्षिण विभागांमध्ये 378 तर मध्य विभागात 202 पदे रिक्त आहेत.
रिक्त पदाचे नाव व लागणारी शैक्षणिक पात्रता
1- पदवीधर अप्रेंटिस– याकरिता अर्जदार हा बीकॉम / बीए / बीबीए / बीएससी /बीई/ बी टेक इत्यादी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे.
2- ट्रेड अप्रेंटिस– दहावी उत्तीर्ण/ बारावी उत्तीर्ण / आयटीआय( स्टेनोग्राफी- इंग्रजी/ सेक्रेटरीअल प्रॅक्टिस/COPA/ ड्राफ्ट्समन / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / लॅब असिस्टंट / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान / मशिनिस्ट / मेकॅनिकल मोटर वेहिकल / मेकॅनिक डिझेल /Reff.&AC मेकॅनिक/ प्लंबर / सर्वेअर / वेल्डर-G&E/MLT इत्यादी
3- टेक्निशियन अप्रेंटिस– सिविल / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी
या भरती करता आवश्यक वयाची अट
या भरती करता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्ष दरम्यान असावे. एससी आणि एसटी प्रवर्गाकरिता वयात पाच वर्षे सुट असते व इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीसाठी तीन वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण
या भरतीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही नियुक्त केले जाईल.
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क
या भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख
या भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 संध्याकाळी सहा पर्यंत असणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल वेतन?
या भरतीमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांना 9000, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 8000 तर टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सात हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.