PCMC Bharti 2023 : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठीची भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे.
वरील भरती अंतर्गत 25 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. तरी या तारखे अगोदर अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदाचे नाव आणि रिक्त जागा
या भरतीअंतर्गत ब्रिडींग चेकर्स पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत असून, पुण्यातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
अर्ज पद्धती
वरील भरती ऑफलाईन पद्धतीने होत आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इच्छुक उमेदवार वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी -411 018 येथे पोस्टाने अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.pcmcindia.gov.in या वेबसाईट भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2023 आहे.
-उमेदवारांनी येथे अर्ज करण्यापुर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.