Police Bharti 2024: पोलिसांची होणार 17 हजार रिक्त पदांसाठी बंपर भरती! वाचा या भरतीची ए टू झेड माहिती

police bharti 2024

Police Bharti 2024:- जे युवक विविध भरती परीक्षांची तयारी करत आहेत व त्यातल्या त्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज असून राज्याच्या गृह विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चालक व शिपाई पदासाठी असलेल्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पोलीस भरतीची प्रतीक्षा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

जर आपण सध्या राज्यातील गुन्हेगारीची स्थिती पाहिली तर यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच बऱ्याच शहरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने त्यामानाने पोलीस खात्यातील मनुष्यबळ कमी  पडत असल्याची स्थिती असल्यामुळे या पोलीस भरतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आपल्याला माहित आहे की अगोदर गृहविभागाच्या माध्यमातून 18 हजार पदांची भरती झालेली आहे व आता 17 हजार पदांची नवीन भरती केली जाणार आहे.

साधारणपणे हा उन्हाळा संपल्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलैमध्ये या नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या भरतीसाठी अगोदर मैदानी चाचणी व शेवटी लेखी परीक्षा होणार असून  लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर साधारणपणे नोव्हेंबरमध्ये या निवड झालेल्या नवीन उमेदवारांचे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग सुरू होणार आहे.

 पदाचे नावे आणि रिक्त जागा

 जेल शिपाई एकूण रिक्त जागा 1900, एमआरपीएफ एकूण रिक्त जागा चार हजार आठशे, पोलीस शिपाई एकूण रिक्त जागा दहा हजार तीनशे अशा एकूण 17000 पदांसाठी ही भरती होणार आहे.

 या पोलीस भरतीविषयी महत्त्वाच्या बाबी

1- राज्यामध्ये एकूण दहा पोलीस प्रशिक्षण केंद्र असून या केंद्रांमध्ये 26 फेब्रुवारीपासून 6000 नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण सुरू झाले असून नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

2- या नवीन भरतीची जून-जुलैमध्ये एकाच वेळी परीक्षा होणार असून पहिल्यांदा मैदानी व त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. सध्याच्या कालावधी हा उन्हाळ्याचा असल्यामुळे मैदानी चाचणी ही जून-जुलैमध्ये घेतली जाणार आहे.

3- या नवीन भरती मधील नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाच्या सोयीकरिता सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी प्रशिक्षण केंद्राची क्षमता 6000 होती.मागच्या भरतीवेळी ती वाढवून 8,600 करण्यात आली. आता परत सरकारची मान्यता घेऊन पाच हजाराने ही क्षमता वाढवण्यात येणार आहे.

 सोलापूर जिल्ह्यातील तरुणांसाठी 142 रिक्त जागांसाठी भरती होण्याची सुवर्णसंधी

जर आपण सोलापूर पोलीस दलाचा विचार केला तर या पोलीस दलातर्फे 32 पोलीस शिपाई व 16 पोलीस चालकांची भरती होणार असून सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून 85 पोलीस शिपाई आणि 9 पोलीस चालकांची पदे भरली जाणार आहेत. यासंबंधीची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 कधीपासून सुरू होणार आहे अर्ज प्रक्रिया?

आज म्हणजेच शुक्रवारी पोलीस भरती विषयीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून 5 ते 31 मार्चपर्यंत  उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe