Army Base Workshop Kirkee : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत “ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस” पदांच्या एकूण 283 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
![Army Base Workshop Kirkee](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-Army-Base-Workshop-Kirkee.jpg)
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी किंवा उमेदवार पदविधारक असावा, येथे अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे वय 14 वर्षे पूर्ण असावे. इच्छुक उमेदवार https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://indianarmy.nic.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या इतर कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडा.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.