Pune Bharti 2023 : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; 75 हजारापर्यंत मिळेल पगार !

Pune Bharti 2023 : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या पुण्यात नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.

वरील भरती “रेडिओलॉजिस्ट, डेंटल सर्जन, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी (आयुष)” पदांसाठी होत असून, या भरती अंतर्गत एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील त्यांच्यासाठी मुलखाती आयोजित केल्या आहेत, तरी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहावे. इच्छुक उमेदवार 25 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीस हजर राहू शकतात.

पदाचे नाव आणि रिक्त जागा

ही भरती रेडिओलॉजिस्ट, डेंटल सर्जन, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी (आयुष) या पदांसाठी होत असून, उमेदवारांनी दिलेल्या तारखेला वेळेत येथे हजर राहावे. लक्षात घ्या येथे 04 रिक्त जागांवर भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी मुलाखतीस जाण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत असून, बेरोजगार लोकांसाठी ही उत्तम संधी आहे.

वयोमर्यादा

येथे वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, समोर. गुरुद्वारा, देहूरोड, पुणे-४१२१०१. या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहू शकतात.

मुलाखतीची तारीख

लक्षात घ्या यासाठी 25 ऑगस्ट 2023 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर वेळेत हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी pune.cantt.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.