Maharashtra Technical Education Society Pune Bharti : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवट पर्यंत वाचा…
वरील भरतीअंतर्गत “सहाय्यक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, आया” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
![Maharashtra Technical Education Society](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/04/Maharashtra-Technical-Education-Society.jpg)
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज पद्धती
वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज एमटीईएस मराठी शाळा म.टे.ए.सो. आवार विश्रामबाग, सांगली. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. त्याअगोदर उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अशा पद्धतीने करा अर्ज
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असाव अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासह उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे देखील आवश्यक आहे.
-वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.