Railway Job 2024: 12 वी पास ते पदवीधरांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पटकन करा अर्ज, मिळेल भरपूर पगार

Ajay Patil
Published:
railway job 2024

Railway Job 2024:- केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभाग तसेच बँकिंग सारख्या इतर क्षेत्रांमध्ये आता नोकरीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर निघताना दिसून येत आहेत व या माध्यमातून थेट दहावी ते बारावी व पदवीधर उमेदवारांना  नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झालेले आहेत.

त्यामुळे विविध भरती परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी  हा कालावधी एक सुवर्णसंधीचा असून याचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे. तसेच रेल्वे विभागाच्या भरतीकरिता वाट पाहणाऱ्या तरुण-तरुणी करिता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे व 2024 मध्ये म्हणजे यावर्षीची रेल्वे भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ही एक मेगाभरती असून या माध्यमातून रेल्वेकडून दहा हजार 844 पदे भरली जाणार आहेत व यामध्ये बारावी पास तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

 रेल्वेत निघाली 10 हजार 844 पदांसाठी मेगाभरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून दहा हजार 844 पदांकरिता मेगाभरती जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी बारावी पास असलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे व पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. ही दहा हजार 844 पदे आरआरबी एनटीपीसीच्या माध्यमातून भरली जाणार असून ही पदे लेव्हल दोन, तीन तसेच पाच आणि सहा मध्ये आहेत.

 या भरती प्रक्रिया अंतर्गत कोणती पदे भरली जाणार?

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ज्युनिअर क्लर्क, अकाउंट क्लर्क, टाईम कीपर, जूनियर अकाउंट असिस्टंट, सीनियर क्लार्क, कमर्शियल अप्रेंटिस, गुड्स गार्ड आणि स्टेशन मास्टर यासारखे पदे भरली जाणार आहेत व महत्वाचे म्हणजे हे सर्व पदे नॉन टेक्निकल कॅटेगरी मधील आहेत.

 अंडर ग्रॅज्युएट पदनिहाय रिक्त पदांची संख्या

या भरतीच्या माध्यमातून बारावी पास म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट करिता 3404 पदे असून यामध्ये….

 जूनियर क्लर्क कम टायपिस्ट एकूण 990 पदे, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट एकूण 361 पदे, ट्रेन्स क्लर्क एकूण 68 पदे आणि कमर्शियल कम टिकट क्लर्क या पदाचे एकूण 1985 पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

 ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधरांसाठी असलेली रिक्त पदे

पदवीधर उमेदवारांच्या माध्यमातून एकूण 7479 पदे भरली जाणार आहेत व यामध्ये….

 गुड्स ट्रेन मॅनेजर एकूण 2684 पदे, चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर एकूण 1737 पदे, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट एकूण 725 पदे, जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट एकूण 1371 पदे आणि स्टेशन मास्तर एकूण 963 पदे या भरती मधून भरले जाणार आहेत.

 उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड ही विविध परीक्षा तसेच मुलाखतींच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासोबतच ट्रॅफिक असिस्टंट व स्टेशन मास्तर या पदांकरिता सीबीटी 1,2, CBAT, डॉक्युमेंट वेरिफिकेशन व मेडिकल एक्झामिनेशन पार करावे लागणार आहे. तसेच बाकीच्या पदासाठी देखील पदानुसार परीक्षा होणार आहे.

 किती लागेल अर्ज शुल्क?

त्या भरतीसाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करतील त्या सर्वसाधारण व ओबीसी वर्गातील उमेदवारांकरिता पाचशे रुपये शुल्क भरणे गरजेचे आहे व त्यासोबतच एससी, एसटी, एक्स सर्विस मॅन, पीएच, महिला व ईडब्ल्यूएस वर्गाकरिता 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

अंडरग्रॅज्युएट पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 रुपये ते 21 हजार 700 रुपये पगार दिला जाईल तर ग्रॅज्युएट पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार पाचशे रुपये ते 35 हजार 400 रुपये पगार दिला जाणार आहे व इतर सुविधा देखील मिळतील.

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

या भरतीसाठी ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते indianrailways.gov.in या वेबसाईटवर अर्ज करू शकणार आहेत.अधिकची माहिती देखील या वेबसाईटवर मिळू शकणार आहे. तसेच यासंबंधीचे रजिस्ट्रेशनची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe