Teachers Recruitment 2024:- महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभाग अंतर्गत अनेक भरती प्रक्रिया राबवल्या जात असून यामध्ये आपल्याला विविध जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत देखील भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत व त्यासोबतच काही बँकांच्या देखील भरतीच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत.
अगदी त्याच पद्धतीने आपण जर पाहिले तर शिक्षक भरतीसाठी गेल्या कित्येक दिवसापासून चातकासारखी वाट पाहत असलेल्या उमेदवारांना आता एक आनंदाची बातमी मिळाली असून अनेक शिक्षकांचे लक्ष लागलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे.
होऊ घातलेल्या या शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेले असून या भरतीच्या माध्यमातून तब्बल 21 हजार 678 शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या शाळांमधील शिक्षकांची केली जाणार भरती
या भरती प्रक्रिया अंतर्गत 21 हजार 678 उमेदवारांची निवड केली जाणारी असून यातील सर्वाधिक पदे हे जिल्हा परिषद शाळातील आहेत तर काही खाजगी अनुदानित, महापालिकेच्या तसेच नगरपालिका व नगरपरिषदेच्या शाळांमधील शिक्षक भरतीचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या कक्षेसाठी शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये एकूण शिक्षकांच्या ज्या काही जागा रिक्त आहेत त्या जागांच्या 80% जागांवर या भरती प्रक्रियेतून शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
विशेष म्हणजे या माध्यमातून 16,799 जागांवर कुठल्याही मुलाखतीशिवाय उमेदवार निवडले जाणार आहेत व उर्वरित 4879 जागांवर मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवार निवडले जाणार आहेत. याकरिता उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करणे गरजेचे आहे व याची सुविधा 8 फेब्रुवारीपासून सुरू केले जाणार आहे.
या जागांचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाणार
शिक्षक पदासाठी आवश्यक बिंदू नामावली जून ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली. परंतु बिंदू नामावली बाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते
व त्यामुळे जिल्हा परिषदांच्या ज्या काही 10% जागा आहेत त्या रिझर्व ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद शाळांमध्ये 70 टक्के पदांवर पदभरती केली जाणार आहे व या जागाबाबतचा निर्णय हा स्वतंत्रपणे घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
कुठे किती आहेत रिक्त जागा?
पवित्र पोर्टलवर ही शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांमध्ये बारा हजार पाचशे पंचावन्न पदे, 18 महानगरपालिकेतील 2951 पदे, नगरपालिका मधील 477 तर नगरपरिषद शाळांमधील 1123 पदे आणि खाजगी अनुदानित शाळांमधील 5728 पदांच्या साठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तसेच गटनिहाय पदांचा विचार केला तर पहिली ते पाचवी एकूण दहा हजार 240, सहावी ते आठवी एकूण 8127, नववी ते दहावी एकूण 2176 आणि अकरावी ते बारावी एकूण 1135 पदे यामध्ये आहेत. महत्वाचे म्हणजे या भरतीमध्ये सर्वाधिक पदे हे मराठी मिडीयम साठी असून ते म्हणजे 18373 पदे यामध्ये आहेत.