Police Bharti 2024: पोलीस भरतीसाठी अर्ज करताना तुम्ही देखील ही चूक केली आहे का? वेळीच करा ‘हे’ काम नाही तर प्रक्रियेतून व्हाल बाद

Ajay Patil
Published:

Police Bharti 2024:- राज्यामध्ये मोठ्या संख्येवर तरुण-तरुणी पोलीस भरतीची तयारी करताना दिसून येतात व असे तरुण-तरुणी गेले कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीची चातकाप्रमाणे वाट पाहत होते.  कारण पोलीस भरती किती गेल्या कित्येक दिवसापासून जाहीर करण्यात आलेली नव्हती.

त्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीत पोलीस भरती जाहीर करण्यात आली. मात्र या भरतीची प्रक्रिया दीर्घ काळ रखडलेली होती. परंतु आता या पोलीस भरतीची प्रक्रिया मागील दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आलेली आहे. या पोलीस भरती करिता लाखो उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत.

सध्या ही प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेदरम्यान पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून उमेदवारांना अनेक वेळा काही सूचना देण्यात येत आहेत त्यापैकीच एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता अर्ज केलेल्या उमेदवारांना फक्त कुठल्याही एका जिल्ह्यामधून या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

कारण आपल्याला माहित आहे की अनेक उमेदवार हे एकच पदाकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करतात. परंतु यामुळे प्रक्रियेनंतर काही ठिकाणी जागा रिक्त राहतात व प्रतीक्षा यादीतील जे काही विद्यार्थी असतात त्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

त्यामुळे आता उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे व त्याकरिता त्यांच्याकडून हमीपत्र देखील घेण्यात येणार आहे.

 एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केला असेल तर 17 मे पर्यंत द्यावे लागणार हमीपत्र

बऱ्याच उमेदवारांनी या भरती प्रक्रिया करिता एकाच पदाकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असून अशा उमेदवारांना फक्त एकच जिल्ह्यातून या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. एकाच पदाकरिता जर वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केलेला असेल तर कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याबाबत हमीपत्र द्यावे अशी सूचना गृहखात्याने दिली असून याकरिता 17 मे पर्यंत हमीपत्र देणे गरजेचे आहे.

याकरिता एका जिल्ह्याची निवड करून त्यासंबंधीची हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात द्यावे अशा सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

जर उमेदवारांनी 17 मे पर्यंत असे हमीपत्र दिले नाहीत तर त्यानंतर मात्र अशा उमेदवारांचे अर्ज बाद होतील असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कारण उमेदवारांनी जर एकाच पदाकरिता अशा पद्धतीने वेगवेगळे ठिकाणी अर्ज केले तर भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर काही जागा रिक्त राहतात.

या माध्यमातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. हा धोका टाळावा याकरिता उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे त्याकरिता 17 मे पर्यंत अशा पद्धतीचे हमीपत्र देणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe