MSEB Bharti 2024 : महावितरण मध्ये “संचालक” पदांच्या जागेसाठी सुरु आहे भरती, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी !

Content Team
Published:
MSEB Bharti 2024

MSEB Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत “संचालक (वित्त)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक असेल, त्यासाठी उमेवारांनी भरती जाहिरात वाचावी, आणि अर्ज सादर करावेत, अर्जासह कागदपत्रे देखील पाठवणे आवश्यक आहे, तसेच येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 60 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज ‘मुख्य महाव्यवस्थापक (HR) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. 4 वा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, तसेच अर्ज 07 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत, भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.msebindia.com/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, अर्जासह कागदपत्रांची प्रत देखील पाठवायची आहे.

-अर्ज 07 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे, भरती संबंधित आणखी शंका असेल तर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe