NIBM Pune Bharti 2024 : राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था (NIBM) पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक अभियंता” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वरील पदासाठी उमेदवार, B.E किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभवी असावा, तसेच अभियांत्रिकी डिप्लोमा केलेला तसेच कामामध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव असावा.
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://www.nibmindia.org/careers/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, अर्ज 15 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.nibmindia.org/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. आर वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर म्हणजेच 15 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत, तसेच अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील जोडावयाची आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.













