Ministry of Defence Bharti : मुंबई संरक्षण मंत्रालयात सुरु आहे भरती, दरमहा मिळेल 75 हजार पगार !

Ahmednagarlive24 office
Published:
Ministry of Defence Bharti

Ministry of Defence Bharti 2024 : सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरतीसंबंधित आणखी माहिती हवी असल्यास बातमी शेवटपर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत “पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

वरील भरतीसाठी उमेदवार एमबीबीएस असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज मेडिकल ऑफिसर-इन- चार्ज, एमआय रूम, मटेरियल ऑर्गनायझेशन (मुंबई), नेव्हल स्टोअर डेपो, घाटकोपर (प.), मुंबई, पिनः ४०००८६ या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात.

अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.mod.gov.in/ ला देखील भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज यावर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-लक्षात घ्या सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारला जाईल.

-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे देखील आवश्यक आहे. कागदपत्रांशिवाय अर्ज अपूर्ण मानले जातील.

-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 असून, त्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe