Anti Corruption Bureau Bharti : लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अंतर्गत भरती सुरु, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी !

Ahilyanagarlive24 office
Published:

Anti Corruption Bureau Bharti 2024 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत विविध शहरामध्ये भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लक्षात घ्या तुम्ही पदवीधारक असणे आवश्यक आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत “विधि अधिकारी गट-ब” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असला पाहिजे. तो सनद धारक असला पाहिजे, तसेच विधि अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक असेल, तसेच यासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे मागासवर्षे पदासाठी 43 वर्षे इतकी आहे.

वरील भरती मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, येथे होणार असून, अर्ज मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२) कार्यालयांच्या पत्यावर पाठवायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट acbmaharashtra.gov.in ला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe