ESIS Pune Bharti 2024 : ESIS पुणे अंतर्गत सुरु आहे भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !

Ahmednagarlive24 office
Published:
ESIS Pune Bharti 2024

ESIS Pune Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 27 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अर्ज ऑनलाईन [email protected] या ईमेल वर सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ६९ वर्षे इतकी आहे. तसेच या भरतीसाठी मुलाखत ‘प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे-411037.’ या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/ ला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेल वर सादर करायचा आहे.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

निवड प्रक्रिया

-उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन वरील पत्त्यावर करण्यात आले आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 27 फेब्रुवारी 2024 रोजी हजर राहायचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe