SBI Recruitment 2024: स्टेट बँकेत होणार मोठी भरती! हीच संधी आहे बँकेत नोकरी मिळवण्याची, वाचा माहिती

sbi recruitment 2024

SBI Recruitment 2024:- विविध भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक सुवर्णकाळ आहे असेच म्हणावे लागेल.  गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून काही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत तर काही सुरू आहेत.

तसेच विविध बँकांच्या माध्यमातून देखील अनेक रिक्त पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. यासोबत आता ज्यांना कुणाला बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल व तशा पद्धतीची तयारी करत असतील अशा तरुण-तरुणींसाठी येत्या काही दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून

ही भरती तब्बल 7000 पेक्षा जास्त जागांसाठी करण्यात येणार आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे या भरतीबाबत अद्याप पर्यंत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. परंतु लवकरात लवकर ही भरती जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारणपणे एप्रिल 2024 मध्ये या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी होईल अशी शक्यता आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख मे महिन्यापर्यंत असेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 या भरतीतून भरली जाणार ही पदे

बँकेच्या माध्यमातून 7000 पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून ही भरती प्रामुख्याने विशेष अधिकारी, लिपिक आणि इतर महत्त्वाच्या पदांसाठी राबवली जाणार आहे.

 केव्हा सुरू होईल अर्ज प्रक्रिया?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या भरतीसाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होईल व त्यासंबंधीचे अधिसूचना देखील एप्रिल महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे.

 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवाराचे कमीत कमी वय वीस वर्ष असणे गरजेचे असून जास्तीत जास्त 28 वर्ष वय असणे आवश्यक आहे. तसेच वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी असण्याची देखील शक्यता आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांना इतका मिळेल पगार

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या भरतीमध्ये लिपिक या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन 19 हजार 900 रुपये तर महिन्याच्या शेवटी मिळणारे भत्ते मिळून त्याला 29 हजार ते 30 हजार रुपये पगार मिळतो.

 किती लागेल शैक्षणिक पात्रता?

1- लिपिक पदाकरिता पात्र उमेदवाराकडे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचे टायपिंगचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे.

2- तसेच उमेदवारांनी भारतातील कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

 उमेदवारांची कशी केली जाईल निवड?

1- भारतीय स्टेट बँकेत भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक परीक्षा घेतली जाईल व ही परीक्षा स्थानिक भाषा आणि इंग्रजी या भाषेमध्ये होईल.

2- जे उमेदवार पूर्व परीक्षा पास होतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.

3- परीक्षा ही एकूण शंभर गुणांसाठी असेल व ज्यामध्ये तीन विभाग असतील.

 किती असेल परीक्षा शुल्क?

1- जनरल/ ओबीसी प्रवर्ग 750 रुपये

2- एससी/ एसटी प्रवर्ग कुठल्याही प्रकारचे परीक्षा किंवा अर्ज शुल्क नसेल.

 अधिक माहितीसाठी या ठिकाणी द्या भेट

भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही sbi.co.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe